कोल्हापूर /-
केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी गो कोरोना चा नारा दिला होता. त्यांनी दिलेला हा गो कोरोनाचा नारा संपूर्ण देशभयर लोकप्रिय ठरला आहे.आजही कोरोना विरुद्ध लढण्यास गो कोरोनाचा नारा प्रेरणादायी ठरत आहे. मात्र गो कोरोनाचा नारा देणाऱ्या ना. रामदास आठवले यांनाच कोरोना ने घेरले. दि. 27 ऑक्टोबर ला ना. रामदास आठवले यांचा आणि सौ सीमाताई आठवले यांचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेंव्हा पासून आठवले दाम्पत्य खाजगी रुग्णालयात दाखल होते. 11 दिवस उपचार घेतल्यानंतर कोरोनावर ना. रामदास आठवले आणि सौ सीमाताई आठवले यांनी मात करून पुन्हा जनसेवेसाठी सक्रीय होण्यासाठी त्यांना आज हाँस्पीटल मधून डिसचार्ज देण्यात आला.या आनंदोत्सवसाठी रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया(आ) कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे(दादा) व प.महा.अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे सर यांनी ऐतिहासिक बिंदु चौक कोल्हापूर येथे नागरीकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. सुरूवातीला महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना हार घालण्यात आला. यावेळी जिल्हाअध्यक्ष उत्तमदादा आपली भावणा व्यक्त करीत असतांना म्हणाले भारत देशातील गोरगरीब दुःखीतांचे आश्रू पुसणार्या लोकनेत्याचे आरोग्य चांगले राहू दे.
यावेळी राज्य सचिव मंगलराव माळगे साहेब,प.महा.उपाध्यक्ष कुमार कांबळे साहेब,प.महा.सहसचिव रूपाताई वायदंडे,जिल्हासरचिटणीस संजय जिरगे,जिल्हाउपाध्यक्ष दत्ता मिसाळ,युवा जिल्हाअध्यक्ष अविनाश शिंदे,कामगार आघाडी प्र.सचिव गुणवंत नागटिळे,शहर कार्याध्यक्ष राहूल कांबळे,शहर अध्यक्ष सुखदेव बुध्याळकर, कामगार शहर अध्यक्ष प्रदिप मस्के,कायदा सल्लागार राहुल सडोलीकर,शहर युवा अध्यक्ष किरण निकाळजे,हातकणंगले अध्यक्ष अविनाश अबंकर,अंकूश वराळे,योगेश आजाटे,बटू भामटेकरअकाश जाधव,प्रज्योक्त सुर्यवंशी,नामदेव नागटिळे यांच्यासह RPI चे पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.