पालकमंत्री ना.उदयजी सामंत, खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटन..
मालवण /-
मालवण शिवसेना महिला आघाडीच्या संकल्पनेतून साकार कारेट्या पासून कंदिला पर्यंत प्रदर्शन व विक्री स्टॉल्सचे उदघाटन..करण्यात आले.”शिव वर्धिनी” ब्रँड चे उदघाटन ‘लोगो’ च्या अनावरणाने मा.खा.विनायकजी राऊत साहेब ह्यांच्या हस्ते झाले* तर सर्व *मान्यवरांच्या हस्ते ‘दिपावली फराळ’ ह्या कॉम्बिनेशन पॅक चे उदघाटन झाले.
महिला आघाडीच्या वतीने ‘एक पाऊल संघटनेकडून स्त्री सक्षमीकरणा कडे’ ह्या ब्रीद वाक्याने सुरू करण्यात आलेल्या ‘शिव वर्धिनी’ ह्या ‘ब्रँड’ संकल्पनेचे कौतुक मा.पालकमंत्री यांनी केले.मा.खा.विनायकजी राऊत साहेब म्हणाले, आज पहिल्याच ‘दिवाळी फराळ’ कन्सेप्ट च्या सुरुवातीच्या उत्कृष्ठ प्रतिसादामुळे नक्कीच महिला उत्साहित आहेत, आत्ता ह्याच उमेदीने ‘शिव वर्धिनी’ ब्रँड महिलांच्या इतर उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी मदत करावी.
मा.आ.वैभवजी नाईक यांनी हा ‘ब्रँड’ मोठ्ठा व्हावा अगदी मुंबईत सुद्धा महिलांच्या उत्पादनाला मार्केट मिळवून द्यायला सर्वतोपरी मदत करणार.
आजच्या ह्या कार्यक्रमासाठी महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, माजी जि.प.अध्यक्ष श्री.संग्राम प्रभुगावकर, गट नेते नागेंद्र परब, माजी समाजकल्याण सभापती बाळा महभोज, नगरसेवक नितिन वाळके,संजय गांधी निराधार अध्यक्ष मंदार केणी, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, महिला कुडाळ-मालवण संपर्क प्रमुख सौ.सुचिता चिंदरकर, तालुका संघटक श्वेता सावंत, दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शहर संघटक रश्मी परुळेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेविका सेजल परब, तृप्ती मयेकर, दर्शना कासवकर, शिला गिरकर, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, लक्ष्मी पेडणेकर, पूजा तळाशीलकर, विद्या फेर्नांडिस, पल्लवी पारकर, पूजा तोंडवळकर, नीलम शिंदे, कविता मिठबावकर, नयना गोवेकर, सुरेखा मसुरकर, नंदा सारंग, अंजना सामंत, नीना मुंबरकर आदी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज पासून सुरू झालेले स्टॉलस् सकाळी ९:०० ते रात्रौ ९:०० दि;१३ नोव्हेंबर २०२० पर्यंत ग्राहकांच्या सेवेत सुरू राहणार आहेत.