कणकवली /-

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे आज रविवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी खारेपाटण येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष प्रपुल्ल सुद्रिक आणि जिल्ह्या कार्यकारिणी व पदाधिकारी उपस्थित होते.ढोल ताशांच्या गजरात, फटाक्याच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदार जयंत पाटील यांचे स्वागत केले.

तर कणकवली येथे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाधयक्ष अनंत पिळणकर, तालुकाध्यक्ष राजू पावसकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, प्रांतिक सदस्य विनोद मर्गज, युवक सरचिटणीस देवेंद्र पिळणकर, युवक जिल्हा सदस्य जयेश परब, सुनंदार पारकर, डॉ. अभिनंदन मालंडकर, सुधाकर कर्ले, तालुका उपाध्यक्ष मंगेश दळवी यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी वैभववाडी तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सावळाराम अनावकर उपस्थित होते.

बऱ्याच कालावधीनंतर राष्ट्रवादीचे नेते जिल्ह्यात दाखल झाले यामुळे राष्ट्रवादीत नवचैतन्य पसरले आहे. जिल्ह्यात पक्षही बळकट होत असताना आता राज्य पातळीवर त्याला चांगला पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. नुकताच पक्षाचे जिल्हा संपर्क मंत्री तथा राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा दौरा केला होता. कार्यकर्त्यांचा मोठा प्रवेश झाला होता. आजही शेकडो कार्यकर्त्यांचे प्रवेश होत असून राष्ट्रवादीत मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page