कुडाळ /-

रंगबहार कुडाळ या संस्थेतर्फे कै.मंदार रमण कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय निबंध लेखनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेसाठी ‘मी आणि माझे/माझा बाबा’ हा विषय असून १५ डिसेंबर २०२० पर्यंत स्पर्धकांनी आपले निबंध पाठवावेत असे आवाहन रंगबहार संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
या निबंध स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रुपये ३०००/-, २०००/- आणि १०००/- अशी पारितोषके आहेत. त्याशिवाय प्रमाणपत्र आणि रंगबहार स्मृतिचिन्ह मिळणार आहे. त्याचबरोबर एकुण तीन उत्तेजनार्थ पारितोषिके काढण्यात येतील त्यांना प्रमाणपत्र आणि रंगबहार स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धकाने आपला निबंध सुवाच्च हस्ताक्षरात अथवा टंकलिखित करून दिनांक १५ डिसेंबर २०२० पर्यंत श्री. शरद परब, संत मित्र ड्रेसेस, एसटी स्टँड समोर कुडाळ किवां श्री. प्रशांत राणे होटेल लक्ष्मी गवळदेव मंदिर समोर कुडाळ पत्त्यावर स्वतः सादर करणे अथवा रजिस्टर्ड पोष्ट करून पाठविणे आवश्यक आहे. रजिस्टर टपालाने पाठवायचा झाल्यास रंगबहार कुडाळ, द्वारा.अ‍ॅड संदेश कृष्णा तायशेटे, केळबाई मंदिर रोड, एसटी स्टँड समोर, कुडाळ तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग-४१६५२० या पत्त्यावर पाठवावा. निबंध स्पर्धेसाठी दहा रुपये प्रवेश फी असून ती मनिऑर्डरने संस्थेच्या पत्त्यावर पाठवायची आहे. किंवा ती गुगल पे ने श्री समीर बाळकृष्ण तारी ९४०३९२२४५० या नम्बरवर जमा करावी. जर फी बँक अकाउंट वर जमा करायची असेल तर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा कुडाळ शहर, अकाउंट नंबर 096400000002386, IFSC Code-SIDC0001096 जमा करावी.
ही स्पर्धा इयत्ता आठवी ते कोणत्याही शाखेची पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली स्पर्धा असून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील कोणत्याही माध्यमिक विद्यालयाचे अथवा महाविद्यालयाचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात निबंध हा कमीत कमी ४०० शब्द आणि जास्तीत जास्त ६०० शब्दात असणे आवश्यक आहे.स्पर्धकाने आपले नाव, पत्ता,फोन नंबर – मोबाईल नंबर,शैक्षणिक पात्रता , शिक्षण घेत असलेल्या हायस्कूल/ संस्थेचे नाव व पत्ता आणि संपर्कासाठी संस्थेचा फोन नंबर व मोबाईल नंबर निबंधाखाली अथवा निबंधावर न लिहिता स्वतंत्र कागदावर लिहिणे आवश्यक आहे . तो कागद निबंधाला जोडून स्पर्धेत सादर करणे आवश्यक आहे अशा. प्रकारचे काही नियम व अटी साठी आणि इतर माहितीसाठी निलेश अशोक जोशी (९४२२६३२१५६), समीर बाळकृष्‍ण तारी (९४०३९२२४५०), सौ.मीना नितीन घुर्यें (८२७५६३१०९७), सौ. यज्ञा देवदत्त गोसावी (९४०५६०५५३९) किंवा अ‍ॅड. सावनी संदेश तायशेटे (९७६५३२१०५१) या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन रंगबहार संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page