कुडाळ /-
कुडाळ सांगिर्डे भागातील १ ते १.५ किमी रस्त्याचे आवश्यक भू संपादन योग्य रीतीने न झाल्याने आमच्या ताब्यात जमीन नसल्याने या पुढे या भागात जो पर्यंत जमीन प्राप्त होणार नाही तो पर्यंत आपण काम सुरु करणार नसल्याचे किंबहुना काही दिवस वाट पाहून काम सोडून जाण्याबद्दलची माहिती आज दिलीप बिल्डकॉम कंपनीचे सर व्यवस्थापक के.के गौतम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या वेळी बोलताना ते म्हणाले कि केंद्र शासनाने भू संपादनासाठी ८.८ २०१७ रोजी ४४६.४६ कोटी व १८ गावाच्या पुरवणी निवाड्यासाठी ८४. ६५ कोटी मिळून एकूण ५३१.११ कोटी रुपये प्रांत कार्यालय कुडाळ यांच्याकडे प्राप्त असूनही पैकी ७३. ०९ कोटी मोबदला धारकाना अद्याप वाटप झालेला नाही
मिळालेल्या माहितीनुसार कुडाळ सांगिर्डे मधील ३० मीटर जागा हि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचीच होती उर्वरित १५ मीटर जागेसाठीचे भू संपादन आवश्यक होते त्या भू संपादना साठी लागणारी रक्कम केंद्र सरकारने कुडाळ प्रांत कार्यालयाकडे वर्ग केली आहे तरी प्रांत कार्यालयाने तांत्रिक बाबींचा आधार घेत महामार्ग प्राधिकरणाला चौपदरीकरणासाठी लागणारी जागा वर्ग केलेली नाही संयुक्त मोजणीतील २४ प्रकरणे अद्याप बाकी असल्याचेही खात्रीलायक बातमी असून सरकारी काम आणि सहा महिने थांब असाच काहीसा प्रकार भूमी अभिलेख ,प्रांत कार्यालय व महामार्ग प्राधिकरण यांच्यामध्ये सुरु असून त्याचा कुडाळवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . प्रांत कार्यालयाकडून फक्त कागदावर भूसंपादन करून जमिनिचा ताबा दिल्याचा आक्षेप कार्यकारी अभियंता यांच्याकडून घेण्यात आल्याचे समजते.