वेंगुर्ला /-
वेंगुर्ला – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठच्या योग शिक्षक पदविका परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये डॉ.वसुधाज् योगा अँड फिटनेस ऍकॅडमीचा निकाल १०० टक्के लागला आहे. ऍकॅडमीचे पाचही विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. सदर परिक्षा योग विद्याधाम कोल्हापूर व योगाचार्य डॉ.वसुधा मोरे यांच्या वसुधाज् योगा फिटनेस ऍकॅडमीच्या माध्यमातून घेण्यात आली. यामध्ये श्वेता गणपत केदार-रेडी (९१ टक्के), श्रृती श्रीराम हिर्लेकर-वेंगुर्ला (८९.३३ टक्के), राधिका प्रकाश गावडे-सावंतवाडी (८८.१७ टक्के), प्रविण आशितोष कुबल-कणकवली (८७ टक्के), सुविच्छा प्रविण गुरव-कणकवली (८६ टक्के) यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ. वसुधा मोरे, अक्षदा मांजरेकर, योगविद्याधाम कोल्हापूरचे रमेश धाक्रस, प्रकाश पाटील, रोहित गवळी यांच्यासह ऍकॅडमीच्या सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.