१४ नोव्हेंबर ला बालदिनी होणार निकाल जाहीर.
कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षणाची दारे खुली रहावी, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे मनोबल वाढविणे तसेच त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना वाव मिळावा या उद्देशाने विद्यार्थी व शिक्षकांसाठी वेंगुर्ले तालुकास्तरील विविध आॅनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी १ली ते २री, ३री ते ५वी, व ६वी ते ७वी अशा तीन गटात पाठ्यपुस्तकातील साभिनय मराठी कविता गायन स्पर्धा, पाठ्यपुस्तकातील साभिनय इंग्रजी कविता गायन स्पर्धा, मराठी पाठ्यपुस्तकातील कथा कथन स्पर्धा, इंग्रजी पुस्तकातील कथा कथन(story telling)स्पर्धा, बाल चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांमध्ये तालुक्यातील ४६१विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
तसेच तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी कविता लेखन स्पर्धा ( विषय – आॅनलाईन शिक्षण),कॅलिग्राफी स्पर्धा( ‘सत्यमेव जयते’ फलकलेखन), फोटोग्राफी स्पर्धा( तालुक्यातील निसर्ग)
इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांमध्ये ९२ शिक्षकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेत प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विजेत्यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्लेच्या च्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहीती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ वेंगुर्लाचे अध्यक्ष एकनाथ जानकर यांनी दिली. जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी संघटना राबवत असलेल्या तालुका व जिल्हास्तरीय उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.