मालवण तालुक्यात ग्रामिण भागातील एस टी वाहतूक सुरू करा.;धोंडू चिंदरकर

मालवण तालुक्यात ग्रामिण भागातील एस टी वाहतूक सुरू करा.;धोंडू चिंदरकर

मालवण तालुका भाजप अध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची मागणी

आचरा /-

दिवाळी हंगामाचा विचार करून तातडीने ग्रामिण भागात एस टी वाहतूक सुरू करावी अन्यथा एस टी प्रशासना विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा मालवण तालुका भाजप अध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिला.याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टी तर्फे चिंदरकर यांनी मालवण तालुका आगार व्यवस्थापक बोधे यांना शुक्रवारी देण्यात आले.या वेळी त्यांच्या सोबत बाबा मोंडकर.दिपक सुर्वे.विजू निकम.जगदीश चव्हाण.सुमित सावंत,अभी गावडे.विक्रांत नाईक आदी भा ज प कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात भाजप तर्फे येणाऱ्या दिवाळी हंगामात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तातडीने पुर्ण क्षमतेने एस टी वाहतूक सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत आहे. या मूळे बहुसंख्य आस्थापने, व्यवहार, आठवडा बाजार सुरू झाले आहेत.मालवण तालुक्यातील ग्रामिण भागातील एस टी वाहतूक बंद असल्याने या भागातील ग्रामस्थांना याचा फटका बसत आहे.त्यामुळे दिवाळी पुर्वी एस टी वाहतूक सुरू करण्याची मागणी धोंडू चिंदरकर यांनी केली आहे.ती न झाल्यास एस टी प्रशासना विरोधात आंदोलन करण्याचा इशारा मालवण तालुका भाजप तर्फे देण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..