वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न..

वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेवक सुहास गवंडळकर,प्रशांत आपटे,धर्मराज कांबळी,श्रेया मयेकर,साक्षी पेडणेकर,नागेश गावडे,तुषार सापळे,विधाता सावंत,प्रकाश डिचोलकर,संदेश निकम,सुमन निकम,पूनम जाधव,शितल आंगचेकर,कृतिका कुबल ,कृपा गिरप – मोंडकर आदी उपस्थित होते.
दिवाळी कालावधीत
आकाशकंदील,पणत्या,मेणबत्ती,फराळ वगैरे साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना बाजारपेठ समोरील मुख्य रस्त्याच्या कडेला जागा देण्यात यावी,अशी सूचना नगरसेवक नागेश गावडे यांनी मांडली.याबाबत कोव्हीड १९ चे नियम पाळून विक्रेत्यांनी विक्री करावी,असे सर्वानुमते ठरले.दिवाळीसाठी न.प.मार्फत बाजारपेठ सॅनिटायझेशासन रात्री ९ वा. नंतर करण्यात येईल.वेंगुर्ले न. प. हद्दीतील घरांवरील पत्राशेडचे शुल्क आकारू नये,असे ठरविण्यात आले.महाराष्ट्र जिल्हा अग्निसुरक्षा अभियान योजनेतून शहरात फायर हायड्रड जाळे तयार करणे,आदी विषयावर चर्चा करण्यात आली.स्थानिक आमदार निधी आल्यावर सभागृहासमोर विषय ठेवले पाहिजेत,तसेच कोरोना कालावधीत चांगले काम केलेल्याना बोनस देण्यात यावा,आदी सूचना संदेश निकम यांनी मांडली.
न. प.मालकीच्या स्थावर मालमत्ता ई लिलावाने देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,दोन गटनेते व मुख्याधिकारी यांची कमिटी स्थापन करण्याचे ठरविण्यात आले.तसेच गाळे धारकांना तीन वर्षांनी नूतनीकरण करण्याची अट शिथिल करून त्याचे अधिमूल्य रकमेवर किमान दहा वर्षासाठी गाळा भाडेतत्तवावर देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याचे ठरविण्यात आले.तसेच
स्थानिक आमदार विकास कार्यक्रम निधी ,१४ व्या वित्त आयोगामधील निधी आदी विषयावर सविस्तर व खडाजंगी चर्चा झाली.यावेळी विधाता सावंत,श्रेया मयेकर, संदेश निकम,तुषार सापळे, शितल आंगचेकर, सुहास गवंडळकर,अस्मिता राऊळ सह अन्य नगरसेवक यांनी विविध सूचना मांडल्या.

अभिप्राय द्या..