सोनावल पाळये ररस्त्याचे काम येत्या ८दिवसात सुरू नकेल्यास कार्यालयाला  घेरावा.;तेरवन-मेढे माजी उपसरपंच प्रवीण गवस यांचा ईशारा

सोनावल पाळये ररस्त्याचे काम येत्या ८दिवसात सुरू नकेल्यास कार्यालयाला घेरावा.;तेरवन-मेढे माजी उपसरपंच प्रवीण गवस यांचा ईशारा

दोडामार्ग/-

सोनावल ते पाळये हे दोन्ही गाव अगदी लगत असल्याने या गावात जाण्यासाठी रस्ता असने अगदी गरजेचे होते अन्यथा मेढे ते भेडशी या मुख्य रस्त्यावरून पूर्ण गावाला विळखा घालून जावे लागत असे यासाठी माजी उपसरपंच प्रवीण गवस आणि सोनावल-पाळये ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे हा रस्ता माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर देखील केला होता परंतु काम मंजूर होवून सदर कामाची मुदत देखील संपली आहे तसेच संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट केल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला असून या रस्त्यावरून येजा करणे खूप कठीण झाले आहे तरी या रस्त्याचे काम येत्या आठ दिवसात सुरू नकेल्यास कार्यकारी अभियंता कुडाळ या कार्यालयाला घेरावा खालून जाब विचारला जाईल असे तेरवन-मेढे माजी उपसरपंच प्रविण गवस यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता कुडाळ कार्यालयास कळविले आहे.

अभिप्राय द्या..