सावंतवाडी
सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वडिलांचे आज रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९० वर्षांचे होते. मडूरा येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले आहे. सावंतवाडी दोडामार्ग उत्कर्ष मराठा समाजाचे ते संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.