कुडाळ /-
कुडाळ नगरपंचायतीची करोना मुक्तीकडे वाटचाल कुडाळ शहर सध्या कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.सध्याच्या परिस्थितीतीत कुडाळ नगरपंचायत हददीमध्ये गेल्या तीन महिन्यात सुमारे 300 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडलेले असुन 100 पेक्षा अधिक कन्टनमेंट झोन तयार करण्यात आलेले होते. परंतु सध्या कुडाळ नगरपंचायत हददीमध्ये फक्त 6 करोना पॉझिटव्ह रुग्ण एका घरातील राहिले असल्यामुळे फक्त 1 कन्टनमेंट झोन शिल्लक राहीलेला आहे. येत्या आठवडयात कुडाळ शहर संपुर्ण कोरोनामुक्त होईल असा विश्वास नगराध्यक्ष श्री. ओंकार तेली यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे कोरोनाचे संक्रमण सध्या आटोक्यात आले असले तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून आपले कुडाळ कोरोना मुक्त करूया असे आवाहन कुडाळ नगर पंचायत चे नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांनी केले आहे.