आचरा /-
आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आचरा गावातील सर्व ९ अंगणवाडया डिजिटल करण्यात आल्या.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना स्मार्ट बनवावे तसेच प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना आधूनिक ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने आचरा सरपंच प्रणया टेमकर यांनी पुढाकार घेतला आहे.चौदा वित्त आयोगातून प्राप्त निधी मधून आचरा गावातील अंगणवाडयांना स्मार्ट टिव्ही बसविण्यात आले.याचा शुभारंभ आचरा सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते झाला. या वेळी उपसरपंच पांडूरंग वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्य रेश्मा कांबळी,चावल मुजावर, गांवकर,यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका,पालक विद्यार्थी आदी उपस्थित होते.आचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमा बद्धल पालक विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.