वैभववाडी /-
खारेपाटण ते भुईबावडा 33 के .व्ही .विद्युत लाईन कोळपे गावापर्यंत रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आली ,मात्र तीच विद्युत लाईन उंबर्डे गावातील रस्त्याच्या बाजूने न टाकता शेतकऱ्यांच्या जमिनीतून टाण्यात आली आहे. याबाबत संबंधित जमीन मालकांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता विद्युत लाईन टाकण्यात आली आहे याबाबत वीज वितरण कंपनीकडे उंबर्डे ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार व मागणी अर्ज करूनही ही विद्युत लाईन रस्त्याच्या बाजूने टाण्यात न आल्यामुळे उंबर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने वीज वितरण कार्यालय वैभववाडी समोर उंबर्डे ग्रामस्थांच्यावतीने बुधवारी 4 नोव्हेंबर रोजी उपोषण करण्यात आले.
विद्युत लाईन बाबत 2016 पासून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे या बाबत तक्रारी अर्ज केलेले आहेत.इतर गावांमध्ये ज्या प्रमाणे विद्युत लाईन रस्त्याच्या कडेने घेण्यात आली आहे.त्या प्रमाणे जे पोल शेतकऱ्यांच्या शेतीतून टाकलेले आहेत ते पोल रस्त्याच्या कडेने टाकण्यात यावेत अशी मागणी गेली अनेक वर्षे सुरू आहे.या बाबत 24 ऑगस्ट रोजी वैभववाडी येथे उंबर्डे गावातील शिष्टमंडळाची भेट घेण्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता कणकवली यांनी सांगितले होते.परंतु अधिकारी आलेले नाहीत.त्यानंतर सायंकाळी कार्यकारी अभियंता रत्नागिरी श्री .पाटील उप अभियंता वैभववाडी श्री .कथले, सहायक अभियंता श्रीमती इंदुलकर ,उंबर्डे ग्रामपंचायतीमध्ये आले .त्यानंतर त्याने शेतातून टाकलेल्या लाईनची पाहणी केली.त्यानंतर उंबर्डे गावातील टाकलेल्या विद्युत लाईनची पाहणी केली. कार्यकारी अभियंता पाटील यानी 2.5 कि मी रस्त्याच्या बाजूने लाईन टाकून देतो ,त्यापैकी 700 मीटर अंडरग्राउंड व उर्वरित रस्त्याच्या बाजूने लाईन टाकून देतो असे सांगितले .त्याप्रमाणे इस्टीमेंट तयार करून नियोजन मंडळाकडे व शासनाकडे सादर करण्याचे आश्वासन दिले होते.आतापर्यंत दोन महिने पूर्ण झाले तरीही या गोष्टीची पूर्तता न केल्यामुळे बुधवारी 4 नोव्हेंबर रोजी उंबर्डे ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या वतीने वीज वितरण कार्यालय येथे उपोषण केले .
यावेळी उंबर्डे सरपंच एस.एम.बोबडे ,पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, रज्जब रमदुल,