सावंतवाडी /-
सावंतवाडी तालुक्याच्यावतीने जागर नवरात्रीचा सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमांतर्गत नऊ रणरागिणींचा सन्मान भाजपा महिला मोर्चाच्यावतीने सावंतवाडी भाजप कार्यालय येथे करण्यात आला.
यात ३९ वर्ष पोलीस सेवेत कार्यरत असणाऱ्या राजलक्ष्मी जयप्रकाश राणे, होमिओपॅथी
डॉक्टर रेवती विनायक लेले, ऍड. मरियम डिंगणकर, श्री शारदा मंदिर ज्युनिअर केजीच्या शिक्षिका सरिता फडणीस,ब्रम्हकुमारी कांचन दीदी, उद्योजिका शुभांगी काकतकर, सिंधुदुर्ग लाईव्हच्या सब एडिटर,
जुईली पांगम, सुप्रिमोज जिमच्या ऑनर नयना सावंत, उद्योजिका शिल्पा सावंत यांचा सत्कार महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे
यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी भाजप सरचिटणीस रेखा काणेकर, आंबोली महिला मंडल अध्यक्षा गीता परब, मोहिनी मडगावकर, मिसबा शेख, मेघना साळगांवकर, दीप्ती माटेकर आदी महिला पदाधिकारी थे मोठ्या संख्येने उपस्थित
होत्या.