मालवण /-
प्रतिथयश उद्योजक सागर वाडकर आणि नगरसेवक मंदार केणी यांनी मंगळवारी मालवणात पीपीई किट आणि मास्क वाटप केले. ग्रामीण रुग्णालय, पोलीस ठाणे आणि तहसिल कार्यालयात हे साहित्य देण्यात आले. जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी अद्यापही कोरोनाचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागासह पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी जनतेला सेवा देत असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने सागर वाडकर आणि मंदार केणी यांनी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्याकडे पीपीई किट आणि मास्क सुपूर्द केली. पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे, पोलीस उपनिरीक्षक नरळे, मंगेश माने, दिलीप खोत, पांचाळ यांच्याकडे मास्क देण्यात आले. तर प्रभारी तहसीलदार आनंद मालवणकर यांच्याकडे महसूल कर्मचाऱ्यांसाठी मास्क सुपूर्द करण्यात आले.