सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्‍यातील काही खाजगी शाळांकडून वसुली केली जात आहे. करोना काळात गेले सात ते आठ महिने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. तसेच लोकांची रोजगार देखील बुडाले आहेत तसेच अवेळी पडलेल्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकरी देखील मेटाकुटीस आलेला आहे अशा परिस्थितीत मागील काही दिवस खाजगी शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांच्या मागे फी साठी तकदा लावत आहेत शैक्षणिक संस्थांची अव्वाच्या सव्वा फी भरणे आर्थिक परिस्थितीमुळे पालकांना शक्य नाही तसेच फी संदर्भात राज्य सरकारचे निर्देश आहेत.यासंदर्भात मनसेच्या वतीने सावंतवाडी येथील शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे निवेदन देऊन मनसेने मागणी केली आहे.

तरी करोना काळात फी साठी तगदा लावणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांची तात्काळ चौकशी करण्यात यावी व या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही विनंती.यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर सचिव विठ्ठल गावडे मनविसे तालुकाध्यक्ष ओमकार कुडतरकर शुभम सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page