मसुरे /-
मसुरे येथील ऐतिहासिक भरतगड किल्ल्यावरती जाणाऱ्या मुख्य रस्त्या ची श्रमदानातून साफसफाई मसूरे ग्रामस्थांनी नुकतीच केली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी ही साफसफाई करण्यात आली.भरतगड किल्ल्या कडे जाण्यासाठी मसुरे ग्रामपंचायत समोरून एक पायरी वजा रस्ता थेट भरतगड किल्ल्यावरती जातो. पावसाळ्यात या रस्त्यावर ती झाडा झुडपांची वाढ झाल्यामुळे हा रस्ता पर्यटकांना चालण्यासाठी त्रासाचा ठरत होता. तसेच दसरा उत्सवात भरत गड किल्ल्यावरती उत्सव होत असल्याने भाविक सुद्धा या ठिकाणी जात असतात. यासाठी संग्राम प्रभुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मसुरे येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून या रस्त्याची साफसफाई केली आणि एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे……
कॅप्शन…
मसुरे भरतगड किल्ल्यावरती जाण्याऱ्या रस्त्याची श्रमदानातून साफसफाई करताना मसुरे ग्रामस्थ..