मालवण /-
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या कार्यकारी मंडळाने एकमताने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मिथुन मालंडकर, तर सरचिटणीसपदी संजय केळुसकर यांची निवड केली आहे. मालवण येथे फेब्रुवारी महिन्यात झालेली मत्स्य दुष्काळ परिषद यशस्वी करण्याकरिता मालंडकर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.
मालंडकर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित कार्यकारणी अशी – संजय केळुसकर ( सरचिटणीस – मालवण ), उपाध्यक्ष – हेमंत गिरप ( वेंगुर्ले ), प्रदीप उर्फ भाऊ मोर्जे ( मालवण ), तेजस्विनी कोळंबकर ( देवगड ), खजिनदार – चैतन्य तारी ( मालवण ), चिटणीस – गोकुळदास मोटे ( आरोंदा ), देवेंद्र वस्त ( वेंगुर्ले ), संजय कोयंडे ( देवगड ), सहचिटणीस – गोविंद केळुसकर ( वेंगुर्ले ), तुळशीदास कोळंबकर (देवगड ), अनिता कुबल ( देवगड ), वसंत गावकर (मालवण ), अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून मच्छिमार समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास दामोदर तांडेल यांनी व्यक्त केला.