सिंधुदुर्ग /-
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ राज्यांमध्ये अधिकृत शासनमान्य संघटना असुन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ही त्यांची अधिकृत शासनमान्य शाखा असल्याची कागदपत्रे जिल्हाक्रीडाधिकारी विजय शिंदे यांच्या जवळ महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे ,कार्याध्यक्ष विजय मागाडे,सचिव नंदकिशोर नाईक यांनी महासंघाच्या अन्य पदाधिकारी व सदस्यांसोबत सुपुर्द केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली सदतिस वर्षे महासंघाचे कार्य इमाने इतबारे सुरू आहे.राज्यशासनाचे मान्यता प्रमाणपत्र, आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र, राज्य सलग्नता प्रमाणपत्र व महासंघाचे निवेदन जील्हाक्रीडाधिकारी यांना देण्यात आले आहे.
क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सहकार्य मागिल सदतीस वर्षा प्रमाणे याहीपुढे केल जाइल याची हमी जिल्हा क्रीडाधिकारी यांना देताना ,अधिकृत महासंघाचेच सहकार्य घेण्यात यावे असे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे, कार्याध्यक्ष विजय मागाडे,सचिव नंदकिशोर नाईक, उपाध्यक्ष जयराम वायंगणकर,विजय मयेकर , खजिनदार शंकर पराडकर , मुख्याध्यापक जयसिंग पाटील,लक्ष्मण शिंदे, उमेश सुकी,कमलेश गोसावी, सुभाष सावंत, डी.डी.सावंत,संजय परब ,उत्तम मळगावकर, दशरथ काळे, अजय सावंत , विश्वनाथ सावंत, सुदीन पेडणेकर,महेश जाधव , विनोद चव्हाण,सुहास बांदेकर ,प्रकाश पावरा, संतोष तावडे,महेश नाईक,सुनिल परब,श्रीनाथ फणसेकर, प्रशांत देसाई, संदीप देसाई ,गजानन सावंत , हनुमंत सावंत , अंकुश मिरकर , शिवदास म्हसगे, प्रितम वालावलकर,प्रशांत सावंत हे महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी च्या सभागृहात झालेल्या सभेत अध्यक्ष अजय शिंदे यांनी राज्य महासंघाच्या १३व २३ सप्टेंबरच्या आॅनलाईन सभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहीती दीली.