बांदा /-
कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून जनसेवेचे व्रत जोपासणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान बांदा मंडल भाजपच्या वतीने नुकताच संपन्न झाला. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे व तालुकाध्यक्षा धनश्री गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदा परिसरातील आरोग्य – आशा स्वयंसेविका, उद्योजिका, शिक्षिका, पोलीस, डॉक्टर तसेच अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान सोहळा बांदा येथील नट वाचनालयाच्या सभागृहात पार पडला.
यावेळी डॉ.अर्चना सावंत (माजगाव), रिदा अक्रम खान (बांदा-पोलीस कर्मचारी), शीतल पोपकर (इन्सुली), हेमांगी गोवेकर (शेर्ले), प्रमिला कोचरेकर, सुचिता मोरजकर, अस्मिता सावंत, विशाखा सावंत, मेघा पेडणेकर, रीमा परब आदींचा सत्कार जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, महिला तालुकाध्यक्षा धनश्री गावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सावंतवाडी पं. स. सभापती मानसी धुरी, जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, जिल्हा सरचिटणीस दादू कविटकर, सावंतवाडी मतदारसंघ महिला उपाध्यक्ष प्रियांका नाईक, अल्पसंख्यक महिला जिल्हा उपाध्यक्ष किशोरी बांदेकर, तालुका सचिव रुपाली शिरसाट आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.