मिठबाव, तांबळडेग, मोर्वेतील महिलांची मत्स्य पेट्यांऐवजी आर्थिक सह्ययक देण्याची मागणी

मिठबाव, तांबळडेग, मोर्वेतील महिलांची मत्स्य पेट्यांऐवजी आर्थिक सह्ययक देण्याची मागणी

मालवण /-

राज्य शासनाने सागरी मच्छीमारांसाठी जाहीर केलेल्या मत्स्य पॕकेजमध्ये मासे विक्रेत्या महिलांसाठी दोन मत्स्य पेट्यांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु मासे विक्रेत्या महिलांना आज आर्थिक साह्याची नितांत गरज आहे. तरी मत्स्य पेट्यांऐवजी रोख रक्कम महिलांना देण्यात यावी अशी मागणी मिठबाव, तांबळडेग आणि मोर्वेतील महिलांनी केली आहे.

सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांना यासंबंधीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तेजस्विनी कोळंबकर, संगीता कोयंडे, मनीषा धावडे, दिक्षा सारंग, शुभांगी कुबल, स्नेहा बापर्डेकर आदी महिलांनी हे निवेदन सादर केले. खलाशी वर्गासाठी पॕकेजमध्ये तरतूद नाही. तरी शासनाने त्यांनाही न्याय द्यावा, अशीदेखील मागणी महिलांनी केली आहे.

अभिप्राय द्या..