असनिये येथील युवकाची काजूच्या बागेत गळफास लावून आत्महत्या.

असनिये येथील युवकाची काजूच्या बागेत गळफास लावून आत्महत्या.

बांदा /-

असनिये वायंगणवाडी येथील विठ्ठल ज्ञानेश्वर सावंत (२९) या युवकाने काजूच्या बागेत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

विठ्ठल हा घरी सकाळी काजूच्या बागेत जातो, असे सांगून घराबाहेर पडला. दरम्यान त्याचा भाऊ त्याला न्याहारी घेऊन बागेत गेला असता त्याला विठ्ठल काजूच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. दरम्यान याबाबतची माहिती त्याने घरच्यांना दिली. त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

अभिप्राय द्या..