सावंतवाडी /–
दोन दिवसांपूर्वी बांदा टोल नाका येथे परप्रांतीय कामगाराचा खून झाला असून यापूर्वी सावंतवाडी तालुक्यात माहे 2011 मध्ये त्या दरम्यान पाच लाखाची हशीश जप्त केली याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी हे परप्रांतीय होते. परप्रांतीय हे मोठ्या संख्येने रेल्वेने , बसने याठिकाणी कामानिमित्त येतात हे परप्रांतीय यु.पी. बिहार ,केरळ कर्नाटक आदी राज्यातून येत असून सध्या लॉकडाऊन मुळे काही ठिकाणी काम भेटत नाही .
आणि भेटले तरी वेळेवर पगार होत नाही म्हणून काहीतरी विकायचे या उद्देशाने गावागावात फिरतात व आसपासच्या भागाची चौकशी करून रात्री दरोडे घालतात व पैसा वाटप करतेवेळी भांडण करतात व एकमेकांच खून करतात तसेच काही ठिकाणी भाडोत्री म्हणून राहतात जे भाडोत्री म्हणून ठेवतात ते माहिती देत नाही त्या ठिकाणी पोलीस पाटलांना तात्काळ आदेश देऊन त्यांची माहिती गोळा करण्यास सांगावे त्याचप्रमाणे काही परप्रांतीयांवर दरोडे, खून असे अनेक गुन्हे असून ते फरारी होऊन या ठिकाणी वास्तव्यास राहतात त्यामुळे या सर्वांचे ओळखपत्रे ते जा राज्यातील भागातून आले त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्यांची माहिती द्यावी व स्थानिक पोलिस स्टेशनला त्यांच्या नोंदी ठेवाव्यात काहीजण दोषी आढळले तर कठोरात कठोर कारवाई करावी त्याचप्रमाणे सावंतवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी दारूधंदे ,मटका, अनधिकृत गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे तपासणी नाक्यावर वाहनांची कडक तपासणी व्हावी रात्रीची दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे रात्रीची गस्त वाढविण्याची गरज पोलीस प्रशासनाला आहे.
आज तरुण वर्ग नाहक व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे . कुटुंबे उध्वस्त होण्याची शक्यता आहे .म्हणूनच आपल्या पोलीस स्थानकाच्या अख्यारीत येत असणाऱ्या अनधिकृत दारू धंदे गोवा दारू ,मटका ,अनधिकृत गुटखा विक्री त्वरित बंद करण्यात यावेत. मनसे कडून निवेदनाद्वारे कळवू इच्छितो की वरील परप्रांतीय अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत आपल्याला अशा धंद्यांना आळा घालण्यास जी काही मदत सहकार्य हवे असल्यास आमचे महाराष्ट्र सैनिक तयार आहेत.