दोडामार्ग /-
कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कळणे संचलित नूतन विद्यालय कळणे आणि प्रा. एम्. डी. देसाई कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कोविड 19 च्या काळात विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी संस्थाध्यक्ष एम्. डी. देसाई यांच्या कल्पकतेने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:- गट ८ वी ते १० वी प्रथम- पियुष अंकुश मोरजकर(करूनासदन), द्वितीय- अनिकेत नीलकंठ गवस(पिकुळे हायस्कूल), तृतीय विभागून – कौस्तुभ सुनील नांगरे(भेडशी हायस्कूल) आणि सीमंतिनी गणेशप्रसाद वालावलकर(कळणे हायस्कूल), उत्तेजनार्थ- अथर्व संदीप गवस(करूनासदन), नंदा लक्ष्मण गवस(उसप हायस्कूल), कविता रामा गवस(पिकुळे हायस्कूल). या गटात एकूण ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.सदर स्पर्धेचे परिक्षण श्री. परेश दुर्गाराम देसाई यांनी केले.
लहान गट ५ वी ते ७ वी प्रथम-चिन्मयी जयसिंग खानोलकर(प्रा.शाळा दोडामार्ग),द्वितीय-सारा इम्तियाज मुजावर(करुणा सदन साटेली),तृतीय-पालवी मेस्त्री(कळणे हायस्कूल),उत्तेजनार्थ-दिग्गज दिग्विजय फडके, चैतन्य मंदार फातर्फेकर,स्नेहल केशव पाटील.या गटात २० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या गटाचे परिक्षण सागर डेगवेकर यांनी केले. सदर स्पर्धा यक्षस्वी होण्यासाठी शिक्षक सतीश धर्णे व संजय तायवाडे यांनी मेहनत घेतली. लवकरच कार्यक्रम घेऊन विद्मार्थांना गौरविण्यात येईल.भाग घेतलेल्या सर्व शाळा, शिक्षक व यशस्वी विद्मार्थांचे मुख्याध्यापक महेंद्र देसाई यांनी अभिनंदन केले आहे.