राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नंदूशेठ घाटे यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच.;अमित सामंत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नंदूशेठ घाटे यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच.;अमित सामंत.

कुडाळ /-

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नंदूशेठ घाटे यांनी देवगड येथील शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर पञकार परिषदेत व्यक्त केलेल्या भावना योग्यच असून त्यांनी व्यक्त केलेल्या भावनाशी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सहमत असल्याचे सांगून.प्रत्येक पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा पूर्ण अधिकार आहे.माञ महाविकास आघाडीच्या तत्वाना तिलांजली देऊन निर्णय घेतल्यास जिल्ह्य़ात त्याचे पडसाद भविष्यात दिसून येतील.याचा विचार शिवसेना नेत्यांनी करावा.

सद्या जिल्ह्यात शिवसेना आघाडीच्या बाबतीत ज्या पद्धतीने वागत आहे.त्याचा विचार केल्यास मिञांना दूर करून दुष्मनाना जवळ करून मिञ पक्षाना कमजोर करण्याचाच प्रयत्न होत आहे.आघाडीच्या फाॅर्मुल्यानुसार मीञ पक्षातील कार्यकर्त्यांची फोडा फोडी करू नये.असे असताना देवगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला हे योग्य नसल्याचे सांगून नंदूशेठ घाटे यांनी नाराजी व्यक्त करीत आघाडीतील मीञ पक्ष असलेल्या शिवसेनेकडून ज्या प्रकारे जिल्ह्य़ात कारभार सूरू आहे ते आघाडीच्या फाॅर्मुल्यानुसार नसून महाराष्ट्रात फक्त शिवसेनेचीच सत्ता असल्यासारखाच कारभार जिल्ह्य़ात सुरू आहे.याबाबत पक्षाचे नेते तथा उपमुख्य मंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधून निर्णय घेण्याची मागणी पक्षाचे जेष्ठ नेते नंदूशेठ घाटे करणार आहेत.त्यांच्या या निर्णयाला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सहमत असल्याचे सांगून घाटे साहेब यांनी घेतलेल्या भूमिकेचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी समर्थन केले आहे.

अभिप्राय द्या..