मालवण /-
प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेच्या मालवण तालुकाध्यक्षपदी येथील आशिष मुकुंद नाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल तालुक्यात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजने मार्फत विविध योजना ग्रामीण भागातील जाणते पर्यंत पोचाव्यात या योजनेचा प्रचार प्रसार व्हावा व याचा लाभ जास्तीत जास्त दुर्बल घटकांना प्राप्त व्हावा यासाठी नाबर यांची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना अभियानाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भगवान बागुल यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे.