शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज.!
🔸”ठेविले अनंते तैसेचि रहावे” या अवस्थेतुन बाहेर पडून शैक्षणिक क्रांतीची गरज..

राज्य सरकारने कोरोनाच्या ठप्प कालावधी दरम्यान शिक्षण क्रांतीची एक मोठी संधी दवडली आहे असे वाटू लागले आहे. कोरोना आपत्तीमुळे ठप्प कार्यकाळादरम्यान आपली पारंपरिक शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करून आजच्या वर्तमान काळात उपयुक्त अशी शिक्षण पद्धती अमलात आणण गरजेचं आहे.बाबर चा जन्म,हुमायुचा मृत्यू, साइन तिठा, कॉस तिठा आदी अनावश्यक गोष्टी शालेय शिक्षणातून बदलणं क्रमप्राप्त आहे.अशीच जुनाट शिक्षण व्यवस्था चालू राहिली तर अगदी पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांला सरकारी कार्यालयात अर्ज कसा करावा कळत नाही,सात बारा,8अ कळत नाहीत ही शोकांतिका आहे.अजुनही वेळ गेलेली नाही अगदी चालू वर्ष असच गेलं तरी चालेल पण शिक्षण पद्धतीत बदल होणं आवश्यक आहे. त्यासाठी 24 मार्च 2020 पासून दिवस उगवलाच नाही असं समजू फार तर पण इतर देशांसारखी व्यवस्था उभी करायची असेल तर तशी शिक्षण व्यवस्था अमलात आणणे गरजेचे आहे.अर्थात मी काही त्यातला तज्ञ आहे असं नाही परंतु आजच्या एकविसाव्या शतकात प्रत्येकाला शिक्षण घेऊन जगण्याला आधार मिळू शकेल अशी भक्कम शिक्षण पद्धती निर्माण व्हावी अशी अपेक्षा मनसेसेच्या वतीने प्रसाद गावडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page