दुर्ग मावळा प्रतिष्ठान’ कोकण विभागच्यावतीने मनोहर मनसंतोष गडावर वृक्षारोपण.;

दुर्ग मावळा प्रतिष्ठान’ कोकण विभागच्यावतीने मनोहर मनसंतोष गडावर वृक्षारोपण.;

कुडाळ-अमिता मठकर

शनिवार दि. ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून 'दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग' च्या वतीने मनसंतोष गडावर वृक्षारोपण करण्यात आले.मनोहर मनसंतोश या गडावर दिनांक १८ जुलै २०२० रोजी केलेल्या वृक्षारोपणातील झाडांची पाहणी करण्यात आली, झाडे मोठी होईपर्यंत प्रत्येक महिन्याला तिथे जाऊन त्याची काळजी घेण्यासाठी दुर्ग मावळा परिवाराची टीम तिथे जाणार होती त्या नियोजनाप्रमाणे आज ही मोहीम आखण्यात आली. या मोहिमेअंतर्गत गडावर लावलेल्या झाडांच्या पडलेल्या जाळ्या नीट करणे, सभोवतालचे गवत काढणे इत्यादी काम करण्यात आले.लावण्यात आलेल्या कदंब व बदाम या झाडांपैकी बदामाचे झाड वगळता कादंबची झाडे जगलेली आहेत. अतिवृष्टीमूळे काही झाडांची पाने गळलेली आहेत परंतु त्यांना नवीन पालवी येत आहे. माणगाव खोऱ्यात कोरोना रुग्ण सापडत असल्याने दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या ही मोहिम २ मावळ्यांनीच पूर्ण केली.मनोहर मनसंतोष गडावर भ्रमंती साठी जाणाऱ्या दुर्ग प्रेमींना दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागतर्फे हीच विनंती आहे की, जे दुर्ग प्रेमी गडावर जातील त्यांनी त्यांना जमेल तेवढी झाडांची जोपासना करण्याचा प्रयत्न करावा.

अभिप्राय द्या..