झुंजार पेडणेकर
५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशभर प्रत्येक शाळेत साजरा हाेत हाेता परंतु काेविड १९ या राेगाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग लाॅक डाऊन मध्ये अडकले आहे. सर्व कामे मंद गतीने चालु आहेत.अशावेळी शाळाही त्याला अपवाद नाहीत.रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शाळा सुरू करणे जाेखमीचे बनले आहे.शाळा सुरू करणे म्हणजे मुलांची जबाबदारी आली.या सगळयाचा विचार करता शैक्षणिक उपक्रम शाळेत साजरे कसे करावे हा यक्ष प्रश्न शिक्षकांपुढे आहे.यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.परंतु काही ठिकाणी रेंजचा मनस्ताप हाेताे. या सगळ्या बाबी़चा विचार करून कणकवली तालुक्यातील जि.प.शाळा ओटव नांदगांव या शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक आनंद तांबे, त्यांना सहकार्य करणा-या साै.रूपाली हुन्नरे यांनी शिक्षक दिनाचे ऑनलाईन नियाेजन करून शिक्षक दिन माठ्या उत्साहात साजरा केला.यासाठी अभ्यासू व्यक्तीमत्व असणारे,मुलाच्या प्रगतीसाठी नेहमी नवीन नवीन प्रयाेग करणारे सावडाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.संताेष जाधव यांचे बहुमाेल मार्गदर्शन लाभलेतसेच अँड्रॉइड माेबाईल असणारे गणेश बांदिवडेकर,रेणूका बांदिवडेकर,तसेच दिप्ती परब मॅडम यांचेही माेलाचे याेगदान या उपक्रमासाठी लाभले.