हायवेला चुकीच्या पद्धतीने बनविलेले वळणे बंद करा.;माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले

हायवेला चुकीच्या पद्धतीने बनविलेले वळणे बंद करा.;माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले

कुडाळ /-

महामार्गाचे काम खूप वेगाने चालू असले तरी कुडाळात येणाऱ्या नागरिकांना असंख्य समस्या सामोरे जाऊन प्रवास करावं लागतं आहे.आर ए सेन हॉटेल भागात हल्ली अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याची प्रचिती हल्लीच कुडाळ शहरातील नागरिकांना अनुभवयास मिळाली काल रात्री रोजी चुकीच्या वळणामुळे अपघात घडून आला.त्याची माहिती मिळताच कुडाळ भाजप तालुका अध्यक्ष तथा कुडाळ माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांनी धाव घेतली व आज हायवेच्या अधिकारी यांना बोलून चांगलेच धारे वर धरले व त्यांनी शब्द दिला दोन दिवसात देसाई पेट्रोल पंप व आर ए संन हॉटेल भागातील सर्व समस्या दूर करणार त्यावेळी त्याच्या समवेत भाजप कार्यकर्ते राकेश नेमळेकर,विजय सावंत,प्रथमेश परब,राजवीर पाटील आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..