कुडाळ /-

श्री माणकादेवी देवस्थान ट्रस्ट नेरूर च्यावतीने नवरात्रोत्सव काळात मंदिरात जमा झालेले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अणाव येथील आनंदाश्रय येथे वाटप करण्यात आले.
श्री माणकादेवी मंदिर नेरूर येथील मंदिरात नवरात्रोत्सव काळात भाविकांनी जमा केलेले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अणाव येथील आनंदाश्रय येथे करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष सदानंद रेवंडकर, सचिव दत्ताराम रेवंडकर, सल्लागार सचिन मदने, राजन पावसकर, सिध्देश चव्हाण, दादा आमडोस्कर, चिन्मय शिर्के, योगेश कासले, उल्हास तुळसकर, आदी उपस्थित होते.
जीवनावश्यक साहित्यामध्ये 220नारळ,100किलो तांदूळ, 5 लि तेल, 5 कि साखर, 5 की पोहे ,आदी साहित्य वाटप करण्यात आले. नवरात्रोत्सव काळात मंदिरात जमा होणारे साहित्य अनाथ, गोरगरिब, व्यक्तींच्या आश्रमात वाटप करण्याचा आदर्शवत उपक्रमाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page