वेंगुर्ला/-
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता राज्य शासन व केंद्रशासन, तालुका व ग्रामीण स्तरावर सरकार यशस्वीपणे विविध उपक्रम राबवित आहेत. या कठीण काळात राज्याला आर्थिक हातभार लाभावा, म्हणून आसोली गावातील मुंबईस्थित आसोली विकास मंडळ, मुंबई च्या सभासदांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधी करता ५१,००० रुपये एवढी रक्कम जमा केली.सदर रक्कम आसोली विकास मंडळ, मुंबई या संस्थेमार्फत धनादेशाद्वारे वेंगुर्ले तहसिलदार यांच्याकडे सदर संस्थेच्या पदाधिकारी यांच्यामार्फत सोपवण्यात आली. यावेळी आसोली तलाठी संस्थेचे अध्यक्ष अशोक धुरी,उपाध्यक्ष सुरेश धुरी, सचिव विजय धुरी,सहसचिव प्रविण परब,प्रमुख सल्लागार भास्कर धुरी,सभासद हेमंत धुरी, प्रकाश परब, यतिन परब ,रमेश नाईक आदी उपस्थित होते.