पुण्यात अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार..

पुण्यात अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार..

पुणे /-

पुण्यातील हडपसर येथे १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीचे चौघांनी अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य दोन आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “हडपसर येथील ससाणेनगर भागात राहणारी १५ वर्षीय तरुणी बाहेर जाऊन येते सांगत २६ ऑक्टोबर रोजी घराबाहेर पडली होती. मात्र बराच वेळ होऊनदेखील मुलगी घरी न आल्याने तिच्या आई-वडिलांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. २९ तारखेला तरुणी दुपारच्या सुमारास सासवड येथे सापडली. तरुणीने आपल्यावर चौघांनी बलात्कार केल्याचं सांगितलं”. तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.

अभिप्राय द्या..