मालवण /-
नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने मालवण पालिकेचे स्वच्छता विभागाचे मुकादम रमेश कोकरे यांचा सेवानिवृत्तीपर आज सत्कार करण्यात आला.
मालवण पालिकेच्या स्वच्छता विभागाचे मुकादम रमेश कोकरे हे आज सेवानिवृत्त झाले. पालिकेचे मुकादम म्हणून कोकरे यांनी गेली बरीच वर्षे काम करताना मालवणवासीयांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत फोवकांडा रिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने आज फोवकांडा पिंपळ येथे कोकरे यांचा ज्येष्ठ नागरिक प्रमोद ढोलम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश मयेकर, प्रसाद परूळेकर, गौरव कदम, गणेश चिंदरकर, प्रशांत केळुसकर, अमर धुरी, नितीन धुरी, विनायक खोत, इरफान खान, रतन मयेकर, उमेश शिरोडकर, जयसिंग खांदारे, मंगेश माळकर, रोहित मयेकर, पोलिस कर्मचारी विलास टेंबुलकर, सकाराम जंगले, विजय खरात यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. यावेळी श्री. कोकरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.