मुंबई /-

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलाय. संभाव्य उमेदवारांची नावं आजच्या बैठकीत सादर करण्यात आली आणि या संभाव्य उमेदवारांच्या नावावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब देखील करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत माहिती दिलेली आहे. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या प्रत्येकी चार म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेच्या प्रत्येकी चार जणांची त्यामाध्यमातून विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे.

या प्रस्तावामध्ये कुणाची नावं आहे हे मात्र अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेलं नाही.
महत्त्वाची बातमी : आणखी एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण, दिलीप वळसे पाटील कोरोना पॉझिटिव्ह
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी :

शिवसेना : आदेश बांदेकर, मिलिंद नार्वेकर, सुनील शिंदे आणि सचिन अहिर

राष्ट्रवादी : एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आदिती नलावडे आणि आनंद शिंदे

काँग्रेस : सत्यजित तांबे, नसीम खान, उर्मिला मातोंडकर आणि सचिन सावंत किंवा राजू वाघमारे

काय म्हणालेत छगन भुजबळ :
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आला. त्या प्रस्तावावर आज बैठकीत चर्चा झाली. आणि तो प्रस्तव मंजूर झाला आहे, असं भुजबळ यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही नावे राजपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवतील. सध्या राज्य विरुद्ध राज्यपाल हे शीतयुद्ध सुरु असल्याने भगतसिंह कोश्यारी आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page