मालवण /-
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांची रत्नागिरी जिल्ह्यात विनंती बदली करण्यात आली आहे.
राज्यातील १७७ पोलिस कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यांचा आदेश आज काढण्यात आला. विशेष पोलिस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी आज राज्यातील विनंती बदल्यांचा आदेश काढला आहे. यात येथील पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून विनीत चौधरी हे येथील पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. कोरोना कालावधीत रस्त्यावर उतरून त्यांनी तालुक्यातील आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवण्यात महत्वाचे योगदान दिले. पोलिस कर्मचाऱ्यांचीही त्यांचे सौदार्हपूर्ण संबंध होते. त्यांच्या विनंतीनुसार त्यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे.