संजय गांधी निराधार योजना समिती सभेत ४२ प्रकरणांना मंजुरी..

संजय गांधी निराधार योजना समिती सभेत ४२ प्रकरणांना मंजुरी..

दोन निराधार महिलांना प्रत्येकी २० हजारांच्या मदतीचे धनादेश सुपूर्द..

मालवण /-

मालवण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या बुधवारी झालेल्या सभेत विविध ४२ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे दोन निराधार महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
मालवण तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची सभा समितीचे अध्यक्ष मंदार केणी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला प्रभारी तहसीलदार आनंद मालवणकर, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांच्यासह सुनील पाताडे, श्रीमती अनुष्का गावकर, प्रमोद कांडरकर, महेंद्र मांजरेकर, भाऊ चव्हाण, गणेश कुडाळकर, कृष्णा चव्हाण आदी सदस्य उपस्थित होते. या सभेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेची २२ प्रकरणे, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे एक प्रकरण, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना गट अ चे एक प्रकरण तर तर गट ब ची १८ प्रकरणे अशी एकूण ४२ प्रकरणे मंजूर करण्यात आली. शहरातील दांडी येथील श्रीमती सृष्टी शैलेश मालंडकर आणि सुकळवाड येथील श्रीमती अक्षता अनुप नाटक या निराधार महिलांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश केणी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

अभिप्राय द्या..