कुडाळ मध्ये उद्या शिवसेना पदाधिकारी बैठक व विविध कामांबाबत चर्चा..

कुडाळ मध्ये उद्या शिवसेना पदाधिकारी बैठक व विविध कामांबाबत चर्चा..

महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार करणार मार्गदर्शन..

कुडाळ /-

कुडाळ मालवण तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या शनिवार दि.३१ ऑक्टोबर रोजी कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे सायंकाळी ६.०० वा. आयोजित करण्यात आली आहे. महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार असून ते या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. कोरोनाचे नियम व अटींचे पालन करून ही बैठक पार पडणार आहे.
यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जि.प.गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. व विविध कामाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तरी कुडाळ मालवण तालुक्यामधील शिवसेना,युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक व मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास याबाबत काही कामे किंवा प्रश्न असल्यास निवेदन घेऊन उपस्थित रहावे.

अभिप्राय द्या..