आचरा /-
कोरोनाचा महामारीचा प्रसार अजूनही चालू असल्याने तसेच पत्येकाने मास्क वापरावा या हेतूने तोंडवळी गावातील पेडणेकर कुटुंबिय यांनी तोंडवळी ग्रामपंचायतकडे पूर्ण गावासाठी पुरतील एवढे मास्क व ग्रामपंचायत साठी 2 पीपीई किट स्वखर्चाने दिले आहेत.
कोरोनावर कोणतीही लस अजूनही आली नसल्याने कोरोनाचा असलेला धोका कायम असल्याने आपल्या गावातील प्रत्येक नागरिकाने खबरदारी म्हणून प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरावा प्रत्येकाच्या घरातील सदस्य सुरक्षित राहावा या हेतूने पेडणेकर कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येत गावातील नागरिकांना मोफत मास्क वाटप करावे असे ठरवत त्यांनी गावासाठी गावचे सरपंच आबा कांदळकर यांच्याकडे मास्क व 2 पीपीई किट दिले. यावेळी पेडणेकर कुटुंबातील शंकर पेडणेकर, सुधीर पेडणेकर, प्रवीण पेडणेकर, प्रशांत पेडणेकर, अशोक पेडणेकर, विजय पेडणेकर, रामभाऊ पेडणेकर, रामदास पेडणेकर, शामसुंदर पेडणेकर आदि उपस्थित होते.