आदर्श शाळा साठी आचरा नं१ची निवड होणे अभिमानाची बाब–सरपंच प्रणया टेमकर

आदर्श शाळा साठी आचरा नं१ची निवड होणे अभिमानाची बाब–सरपंच प्रणया टेमकर

आचरा /-

महाराष्ट्र राज्यातील तीनशे प्राथमिक शाळांमधून मालवण तालुक्यातून केंद्र शाळा आचरे नं एक ची निवड होणे ही कौतुकास्पद बाब असून या मुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असल्याचे मत आचरा सरपंच प्रणया टेमकर यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद आदर्श शाळा (माॅडेल स्कूल) म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्रातील तीनशे शाळांमध्ये केंद्र शाळा आचरे नं १ची निवड झाली या बाबत प्रसिद्धी आणि प्रचारचा शुभारंभ आचरा सरपंच प्रणया टेमकर, जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस,आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या हस्ते आचरा तिठा आणि बाजारपेठ येथे प्रसिद्धी फलकाचे अनावरण करून झाला. या अनावरण प्रसंगी सरपंच प्रणया टेमकर या बोलत होत्या. या वेळी त्यांच्या सोबत जिल्हापरिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, केंद्र प्रमुख सुगंधी गुरव, शाळा मुख्याध्यापक स्मिता जोशी, उपसरपंच पांडूरंग वायंगणकर जयप्रकाश परूळेकर,प्रकाश पेडणेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन घाडी, शिक्षक माने, यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनीही केद्र शाळा आचरे नं एक ची आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी निवड झाली ही आचरा गावासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या हस्ते बाजार पेठ येथील प्रसिद्धी फलकाचे अनावरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार माने यांनी मानले.

अभिप्राय द्या..