मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने मान्यता..
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली माहिती
कणकवली /-
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सन २०११-२० या वर्षातील बँच-२ मधून देवगड तालुक्यातील ८ रस्ते व वैभववाडी तालुक्यातील ४ रस्ता कामांना प्रशासकीय मान्यता महाराष्टू राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने व आमच्या पाठपुराव्यातून मिळाली असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली. पावसाळ्यानंतर ही कामे मार्गी लागतील, असेही सावंत यांनी सांगितले
देवगड व वैभववाडी तालुक्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यांच्या दुरूस्तीची मागणी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. याची दखल घेत पालकमंत्री, खासदार यांच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यांच्या कामाना मंजूरी मिळाली आहे.
यात देवगड तालुक्यातील आरे, निरोम मुख्य रस्ता ते बोडेवाडी बुधवळे रस्ता रू. २ कोटी ८८ लाख, इळये सडा वरणवाडी मिठमुंबरी सुकेतळे रस्ता रू.४ कोटी १३ लाख, एसएच १७७ ते पाळेकरवाडी रस्ता रू.२ कोटी ६४ लाख, दाभोळे पाटकरवाडी रस्ता १ कोटी १४ लाख, प्रजिमा १३ ते किंजवडे चिरेखाण रस्ता रू.२ कोटी १० लाख, कालवी टेंबवली रस्ता रू.३ कोटी ३२ लाख, एमएसएच ०४ ते पोयरे मसवी रस्ता रू.3 कोटी, खालचीवाडी रस्ता रू.१ कोटी १० लाख तसेच वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे बेळेकरवाडी खांबलवाडी वरचीवाडी नापणे रस्ता रू.२ कोटी ३६ लाख, नेले हातदे रस्ता रू.१ कोटी १ लाख, कोळपे भुसारवाडी रस्ता रू.१ कोटी ४० लाख, सडुरे इजिमा १० ते तांबळघाटी सौंदळे रस्ता रू.५ कोटी असे एकूण मिळून रू.३३ कोटी ८५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यांच्या कामांमुळे वाहनचालक व प्रवाशांना होणारा त्रास दूर होणार असल्याचे सावंत यांनी सांगीतले.