सावंतवाडी /-
भाजप युवा मोर्चा शहरअध्यक्ष पदी संदेश टेंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बाबत आज सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष संजू परब आणि युवा मोर्चा विधानसभा प्रमुख सौरभ गावडे यांनी जाहीर केली आहे.
यावेळी युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस भूषण आंगचेकर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस तुषार साळगावकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित तसेच भाजपचे शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, केतन आजगावकर, अमित परब आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी शहरात भाजप युवा मोर्चा वाढवण्यासाठी शहराचे प्रभारी म्हणून भूषण आंगचेकर आणि तुषार साळगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.