संदेश पारकर यांना मिळालेली पदे नारायण राणेंमुळेच.;आपली कुवत ओळखून टीका करावी.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची टीका

संदेश पारकर यांना मिळालेली पदे नारायण राणेंमुळेच.;आपली कुवत ओळखून टीका करावी.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची टीका

कणकवली /-

स्वत: ची क्षमता नसताना नारायण राणेंवर टीका करणाऱ्या संदेश पारकर यांनी मात्र आपल्या सगळ्या सभ्यता गुंडाळून ठेवल्या. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंमुळेच संदेश पारकर यांना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळाले. त्यानंतर पारकर यांच्या नशिबी कोणतेच पद परत आले नाही. पारकर आता ज्या पक्षात आहेत, तेथे पारकर यांना साधे पक्षाचे घटनात्मक पदही दिलेली नाही. त्यावरून पारकर यांनी आपली कुवत ओळखावी व नंतरच नारायण राणेंवर टीका करावी, असा सल्ला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे संदेश पारकर यांना दिला.संदेश पारकर यांनी मंगळवारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती, त्या टिकेला नलावडे यांनी प्रसिध्दी पत्रकातून प्रत्युत्तर दिले.

प्रसिद्धी पत्रकात नलावडे म्हणाले, सत्ताधारी पक्षात असून सुद्धा गेले सहा महिने अंगरक्षकासाठी पारकर यांना झटावे लागते. पारकर यांना अंगरक्षकांची गरज काय हा प्रश्न न उलगडणारा आहे. अंगरक्षक घेऊन शायनिंगबाजी करण्यापुरतीच पारकर यांची मर्यादा आहे. सत्ता असून देखील शासकीय अंगरक्षक मिळत नाही ही पारकर यांची राजकारणातील उतरती कळा आता त्यांनी ओळखावी. नारायण राणेंवर टीका करून स्वतः चे अस्तित्व दाखवणाऱ्या पारकर यांनी राजकारणातील आपले निवृत्तीचे वय झाले हे ध्यानात घ्यावे. सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादी त्यानंतर पुन्हा काँग्रेस, नंतर भाजप व आता शिवसेना एवढे पक्ष बदलूनही पारकर यांना फक्त नारायण राणे यांनीच पद दिले. राणेंनी साथ सोडल्यानंतर पारकरांच्या नशिबी पराभवच आले. त्यामुळे आपली कुवत ओळखून पारकर यांनी आपली जीभ चालवावी. नारायण राणेंवर टीका करून प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या पारकर यांना कणकवलीकरांनी नाकारले. अशा कणकवलीतही अस्तित्व नसणाऱ्या पारकर यांनी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांवर टीका करणे म्हणजे स्वतः ची लाल करण्यातला प्रकार आहे. नारायण राणेंकडून पद घेऊन कृतघ्न झालेल्या पारकर यांनी पदाच्या लालसेपोटी नारायण यांची साथ सोडली. पण त्यांची मर्यादा कणकवली पुरतीही राहिली नसल्याची जाणीव कणकवलीकरांनी निवडणुकीत करून दिली. गद्दारीचे दुसरे नाव म्हणजे संदेश पारकर असा मेसेज जिल्ह्या

अभिप्राय द्या..