ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 लढतीत यजमान इंग्लंडने अवघ्या 2 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.घरच्या मैदानावर सलग तिसरी मालिका खेळणाऱ्या इंग्लंड संघाने याही मालिकेत वर्चस्व कायम राखले. इंग्लंडने डेव्हिड मलानच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर 7 गडी गमावून 20 षटकांत 162 धावा केल्या.विजयासाठी 163 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 160 धावांवर रोखत इंग्लंडने 2 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.इंग्लंडच्या मलानने 43 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 66 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ऍश्टन ऍगर, केन रिचर्डसन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी 2 तर, पॅट कमिन्सने एक बळी घेतला.ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात चांगली झाली. डेव्हिड वॉर्नर व ऍरन फिंच यांनी 98 धावांची सलामी दिली.वॉर्नरने 58 धावा करत शानदार अर्धशतकी खेळी केली.मात्र,नंतरच्या फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. स्टिव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनाही अपयश आले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी 2 तर, मार्क वुडने एक बळी घेतला.