भाजपच्या वतीने कुडाळ तालुक्यातील गाव भेट दौऱ्याचा दुसरा टप्पात पूर्ण..

भाजपच्या वतीने कुडाळ तालुक्यातील गाव भेट दौऱ्याचा दुसरा टप्पात पूर्ण..

आंब्रड मतदारसंघात गावा गावात बांधावर जाऊन बळीराजाची केली विचारपूस..

कुडाळ /-

भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुडाळ तालुक्यात प्रत्येक विभागातील प्रत्येक गावात भेट देऊन शेतकऱ्यांची चर्चा करण्याच्या निमित्ताने गावभेट दौऱ्याच्या दुसऱ्या टप्यात आज आज आंब्रड मतदारसंघात गावा गावात बांधावर जाऊन बळीराजाची केली विचारपूस केली. यावेळी आंब्रड जि प मतदार संघातील सोनवडे गावापासून दौऱ्याची सुरवात करण्यात आली..
सोनवडे, घोटगे, भरणी, जांभवडे, कुपवडे, भडगाव गावातील ग्रामस्थांनी या गावभेट कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग घेऊन विविध मागण्यांसाठी निवेदने दिली.

यावेळी शेतकऱ्यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त झालेल्या शेतीची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी आणि योग्यरीतीने मिळावी त्याचप्रमाणे या मतदारसंघातील रस्ते दुरुस्तीची कामे त्याच प्रमाणे या भागात भेडसावणारी मोबाईल टॉवरची समस्या तसेच अन्य विकास कामे यासाठी निवेदने दिली आहेत. या सर्व गोष्टींचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाठपुरावा करून या मतदारसंघातील कामे प्राधान्याने करण्याबाबत ग्रामस्थांना आश्वस्त केले आहे.

यावेळी शेती नुकसान भरपाई संदर्भात बोलताना शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी याकरिता गावस्तरीय कर्मचारी व यंत्रणांना वेळेत काम करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषिअधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे आश्वासन श्री. रणजीत देसाई यांनी दिले.

या दरम्यान ज्यांच्यावर शेती नुकसानीच्या पंचनाम्याची जबाबदारी आहे अश्या काही तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांचीही भेट घेण्यात आली. त्याचप्रमाणे या विभागातील मोबाईल नेटवर्क संदर्भात BSNL कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर नेटवर्क सुधारण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद गटनेते श्री रणजीत देसाई, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, भाजप नेते राजू राऊळ, जि प सदस्य लॉरेन्स मान्येकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, भाजपा युवामोर्चा अध्यक्ष भाई सावंत, कुडाळ मंडळ अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडळ अध्यक्ष गोपाळ हरमलकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य मोहन सावंत, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, युवामोर्चा जिल्हा प्रवक्ता दादा साईल, प.स. सदस्य बाळू मांडव, सुप्रिया वालावलकर, तालुका सरचिटणीस विजय कांबळी, देवेंद्र सामंत, युवामोर्चा तालुकाध्यक्ष पप्या तवटे, नगरसेवक सुनील बांदेकर, नारायण गावडे, बाळा राणे, विभागीय अध्यक्ष दिलीप तवटे, शक्ती केंद्र प्रमुख अनिल परब, सोनवडे सरपंच उत्तम बांदेकर, घोडगे सरपंच अमोल तेली, सोनवडे उपसरपंच वामन गुरव, भडगावचे माजी सरपंच रवी सावंत, प्रितेश गुरव, योगेश राऊळ इत्यादी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..