सावंतवाडी /-
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे .ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी सौ. दीपाली पाटील यांनी सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रापंचायत कर्मचाऱ्यांना लवकरच दिवाळीची भेट मिळणार आहे
याबाबत अधिक माहिती अशी *ग्रा.प.कर्मचारी यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान !*
उप मुख्ख कार्यकारी सौ.दिपाली पाटील यांचे आदेश
जिल्हयातील ग्रा.प.कर्मचार्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी महाराष्ट राज्य ग्रामिण ग्रा.प.कर्मचारी संघटनेचे जिल्हध्यक्ष श्री.हरिश्चंद्र आसयेकर सचिव श्री सूहास बांबार्ङेकर ,सहसचिव श्री.हनूमान केदार ,गुरुनाथ घाङी यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्ख कार्यकारी अधिकारी सौ.दिपाली पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच याबाबत निवेदन देण्यात आले होते.त्या अनुषंगाने सौ.पाटील यांनी ग्रा.पं.कर्मचार्यांना दिवाळीभेट म्हणून सानूग्रह अनूदान अदा करण्याचे आदेश निर्गेमित केले आहेत!