कणकवली /-

नांदगांव तिठा येथे सन्मित्र रिक्षा संघटना नांदगांव यांचे रिक्षा स्टॅन्ड गेली ४० वर्षे आहे . या ठिकाणी नांदगाव , असलदे , तोंडवली- बावशी , ओटव व माईण , पियाळी या गावातील रिक्षा व्यावसायिक व्यवसाय करत आहोत.

हे अधिकृत तीन रिक्षा स्टॅन्ड आहे . तरी देखील स्टॅन्ड लगतच्या इमारतीचा मालक सुरेश उर्फ बाळा अर्जुन मोरये , मुलगा कमलेश सुरेश मोरये व सिध्देश सुरेश मोरये , (सर्व राहणार नांदगांव तिठा , ता . कणकवली) हे तिघेही रिक्षा व्यावसायिकांना नेहमी शिवीगाळ , मारहान करत तुमच्या रिक्षा इथे लावू नका असे सांगत धमकी देत आहेत.त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी संघटनेच्यावतीने पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी केली.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटना कार्याध्यक्ष सुरेंद्र कोदे, नांदगाव रिक्षा संघटना अध्यक्ष विलास कांडर, देवू डामरे,असलदे सरपंच पंढरी वायगणंकर,भाई मोरजकर, महामुद काझी, दिलीप डामरे, तैयब नावलेकर, अस्लम पाटणकर,संजय जेठे, जाफर कुणकेरकर, सुरेश मोरजकर, सुनील बोभाटे, सलीम नावलेकर, समशउद्दीन बटवाले,मंगेश बोभाटे,निलेश मोरये, मधुसूदन पोकळे आधी रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात,सदर सुरेश मोरये याने दसऱ्या दिवशी तैयब नावलेकर यांच्या सायंकाळी ५ वा . अंगावर धावुन जात आई , बहिण , पत्नी वरुन शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली .

माझे कुटुंब दहशतीखाली आहेत . तसेच रिक्षा संघटना अध्यक्ष देवु जानु डामरे ( रा.असलदे ) यांना दिलांक २७ ऑक्टोबर २०२० रोजी यांच्या अंगावर जात शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली आहे . सर्वधर्मीय या रिक्षा स्टॅन्डवर ६०-७० रिक्षा नादगांव तिठा येथे सर्वधर्मियांच्या एकोप्याने गेली ४० वर्षे व्यवसाय व सामाजिक उपक्रम करत आहेत . विनाकारण सुरेश मोये व त्यांची मुले रिक्षा व्यावसायिकांना व नागरिकांना , व्यापारांना त्रास देत आहे . यापुर्वी संशयित सुरेश मोर्ये व त्यांच्या मुलांवर गुन्हे दाखल आहेत.त्याची गुन्हेगारी पाश्वभूमी आहे.त्यामुळे सदर व्यक्तींवर गुन्हे दाखल करत आम्हाला न्याय मिळवून द्यावा.अन्यथा नांदगांव – तिठा येथे आम्ही सर्वजण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page