भाजप किसान मोर्चाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन सादर…

मालवण /-

अवकाळी पावसाने शेती व सुपारी बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या शेतकऱ्यांना शासनाने दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी तालुका भाजप किसान मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदन आज तहसीलदारांना सादर करण्यात आले.
यावेळी किसान मोर्चाचे
जिल्हा सरचिटणीस अरविंद सावंत, तालुकाध्यक्ष किशोर नरे, प्रकाश राणे, प्रसाद भोजने, हरी केळुसकर, महादेव सावंत, मिलिंद लोहार, भाजपचे विलास हडकर, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष दीपक पाटकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, ममता वराडकर, प्रणिता लंगोटे, महेश सारंग, समीर बावकर, भाऊ सामंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने भातशेती व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच अवकाळी पावसामुळे सुपारी झाडास लागणारी बारीक सुपारीची फळे गळून पडत असून सुपारी बागायतदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. भात, नाचणी, भुईमुग हे पिक पूर्ण तयार होऊन शेतकरी आपल्या घरात पिक आणणार असतानाचे कालावधीत अवकाळी पाऊस झाल्याने फार मोठे नुकसान झाले आहे. या पिकाच्या उत्पन्नासाठी शेतकऱ्याने पूर्ण मेहनत घेऊन त्यासाठी आर्थिक खर्च केला आहे. या सर्वाचा विचार करता शेतकऱ्यास हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळण्याची आवश्यकता आहे. शासनाने ही मदत जाहीर करुन लवकरात लवकर दिवाळीपुर्वी लाभार्थी खात्यावर जमा करावी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचे अपघाताने निधन झाले अशा शेतकरी कुटुंबातील त्यांच्या वारसानी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेखाली परिपूर्ण प्रस्ताव संबंधीत कार्यालयात मुदतीत सादर केले आहेत. अशा कुटुंबाना अजुनही आर्थिक मदत मिळालेली नाही. तरी अपघातग्रस्त कुटुंबाचे वारसाना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page