आ.वैभव नाईक यांनी पेंडूर,खरारे येथे भात शेतीच्या नुकसानीची केली पाहणी..

सिंधुदुर्ग /-

अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी १० हजार कोटी रुपयांची मदत राज्य सरकारच्या वतीने जाहीर केली असून नुकसानग्रस्त शेवटच्या शेतकऱ्या पर्यत ही मदत पोचविण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.लवकरात लवकर ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथे भातपीक नुकसानीच्या पाहणीवेळी सांगितले.

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवणचे प्रभारी तहसीलदार आंनद मालवणकर यांच्यासमवेत मालवण तालुक्यातील पेंडूर व खरारे येथे शेती बांधावर जात भात शेतीच्या नुकसानीची आज पाहणी केली.यावेळी त्यांनी पंचनाम्यांचा आढावा घेतला.मालवण मध्ये आतापर्यंत ४ हजार हेक्टर शेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.तसेच गत वर्षी झालेल्या नुकसानीच्या भरपाई बाबतही आ.नाईक यांनी आढावा घेत विचारणा केली.
यावेळी मालवण तालुका कृषी अधिकारी व्हि.जी.गोसावी,तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगरसेवक मंदार केणी,पं स.सदस्य कमलाकर गावडे,अण्णा गुराम,पेंडूर तलाठी एस.एल.नाकाडे, बाळ महाभोज, बाबू टेंबुलकर,बिट्टू सावंत,रामू सावंत,पपी सावंत, बाबू कांबळी, दशरथवालावलकर,संतोष परब, राजन सावंत, संजय राऊळ,सुनील सावंत,संभाजी परब, ज्ञानदेव वाईरकर,अनिल सावंत गजानन सावंत, नारायण सावंत,कृषी सहाय्यक पवनकुमार सौंगडे ,मनिषा गिते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page